06 September 2020

परदेश प्रवास

परदेश प्रवास टिप्स
पासपोर्ट च्या पहिल्या/शेवटच्या पानांची एका पानावर फोटो कॉपी काढल्या वर मागील रिकाम्या पानावर काय काय माहिती काळ्या पेनाने लिहावी ? आणि नंतर दोन्ही पानाच्या पाठपोट बऱ्याच कॉपीज काढाव्यात 

1) नाववय, dob 
2) ट्राव्हेल इन्शुरन्स पोलिसी न ,आणि कॉन्टॅक्ट प्रोसिजर कुठे इमेल करावा ,फोन न (टोल फ्री)आणि एजंट चा फोन न नाव 
3) विमान तिकिटांची डिटेल्स 
तारीख,वेळ,विमान तळ, फ्लाईट न ,विमान कंपनी ,त्यांचं टोल फ्री न -- निघण्या पासून परत येई पर्यंत (तिकीट रेफ न/कोड) सीट न 
4) ज्या (जेव्हढ्या इंटरनॅशनल प्रवास करून इमिग्रेशन लागेल त्या त्या देशातील)नातेवाईकांच्या घरी जाणार आहात त्याच नीट पत्ता,पिन कोड सह,फोन न(तेथील सगळ्यांचे), तो कुठल्या कंपनी मध्ये नोकरी करतो तिचे नाव ,हुद्दा ,त्याचा इमेल आयडी 
5)जर ट्राव्हेल कंपनी तर्फे जात असाल तर तिचे नाव ,इंडिया तील कॉन्टॅक्ट न,परदेशातील कॉन्टॅक्ट न आणि नाव
6) तुमच्या व्हिसा ची डिटेल्स देश वार 
देश, इश्यु डेट, व्हॅलीड टिल ,व्हिसा न, आणि काही रेफ न असतील तर ते 
7) भारतातील कॉन्टॅक्ट न आणि नाव,नाते 
8) सोबत पत्नी(पती) असेल तिचा पासपोर्ट न 
,इश्यु डेट ,व्हॅलीड till,प्लेस ऑफ इश्यु आणि पासपोर्ट प्रमाणे तिचे नाव,dob, पत्ता(हे सगळे पासपोर्ट प्रमाणेच )- व्हिसा व्हॅलीड till 
9)तसेच मुलांच्या बाबतीत पण  हीच माहिती

10)तुमची इमर्जनसी ओषधाची नावे ,औषध कम्पनी चे नाव/जेनेरिक नाव ,आणि तुम्हाला असलेला आजार थोडक्यात ,ब्लड ग्रुप ,
11) ही माहिती हातात असली की सारखा सारखा पासपोर्ट काढावा लागत नाही जेथे मागतात तेथेच काढून दाखवा


या अशा माहितीपूर्ण कागदाच्या 10 /12 प्रत्येकाने(लहान मुले सोडून)पाठपोट सुस्पष्ट कॉपीज काढा 
एक एक चेक इन बॅग्स च्या कुलूप न लावलेल्या कप्प्यात (असेल तर नाही तर आत मध्ये दर्शनी )ठेवा 
एक शेजारी द्या एक एक जवळच्या नातेवाईक/मित्र याना द्या ,एक एक ज्याचे कडे परदेशी जाल त्याचे कडे आणि/किंवा टूर मॅनेजर कडे द्या 
आणि एक घडी करून तुमच्या पासपोर्ट मधेच/जवळ एका पेनसहित ठेवा 


परदेश प्रवास -काही टिप्स 
1)थर्ड पार्टी चेक किंवा त्रयस्थ नजरेतून तपासणी 
तुमचा जवळ चा नातेवाईक परदेशी निघाला की ,किंवा तुम्ही स्वतः निघाला की ही त्रयस्थ तपासणी घरातील दुसऱ्या कोणी/स्वतः करावी 
काय तपासावे ?
सगळ्या जाणार्याचे पासपोर्ट ,त्यातील व्हिसा हे व्हॅलीड आहेत ना?
त्यांचे प्रवासाचे तिकीट --तारीख आणि विमानाची वेळ 
हे सगळे तपासून ओके झाले की त्यांना ते परत व्यवस्थित देऊन योग्य रित्या बरोबर ठेवत आहेत ना ते बघणे 
2) पासपोर्ट च्या पहिल्या/शेवटच्या पानांची एकाच पानावर फोटो कॉपीज काढून ठेवा 
एक बरोबर ठेवा बाकीच्या प्रत्येक बॅग मध्ये ठेवा 
त्या कॉपी च्या मागे तुम्ही जिथे जिथे जाणार आहात तेथिल नाव+पत्ता व्यवस्थित लिहून सोबत फोन नंबर /इमेल आयडी सह 
जमल्यास याची पण कॉपी काढून ठेवा 
जास्त काढा एक दोन घरच्या ना द्या 
कारण लँडिंग कार्ड विमानात भरावे लागते 
तेथील अपुरा प्रकाश/जागा या मुळे पासपोर्ट खाली पडतो /राहून जातो
जर अशी कॉपी असेल तर पासपोर्ट बाहेर काढायची जरुरीचं नाही पडत त्या शिवाय च लँडिंग कार्ड भरता येते 
3) पासपोर्ट बरोबर एक ही पैसे ठेऊ नका 
कारण बिन पैशाचा पासपोर्ट जरी चोरीला गेला तरी मिळण्याची शक्यता असते 
पासपोर्ट साठी अगदी छोटी बॅग/पाऊच मिळतो ती गळ्यात कायम ठेवायची ती पण क्रॉस मध्ये शाळेत पूर्वी दप्तर अडकवत होते तसे
4) वरील त्रयस्थ तपासणी मध्ये तुमच्या केबिन बॅग्स आणि हँड बॅग मध्ये खालील वस्तू नाहीत ना हे चेक करून घ्या आणि काढून चेक इन बॅग्स मध्ये टाका
चाकू,सुरी,कात्री, रेझर ब्लेंड सह,पिना,नेल कटर,मसाले,पाणी,इतर काही द्रव 50 मिली पेक्षा जास्त 
परवा येताना माझे कडे 5रु ची 15,20 कॉइन्स होती ती पण त्यांना सोन्या ची नाहीत ना हे दाखवावे लागले 
5)अंगावरील सर्व दागिने अंगठ्या काढून पर्स मध्ये टाका 
त्याच्या गेट मधून थोडा देखील आवाज येता कामा नये 
माझे एकदा पॅन्ट च्या इनर पॉकेट मध्ये नोटांची पुरचुंडी होती त्या वर पण ऑब्जेक्शन निघाले तपासणी च्या वेळी त्यांनाबाहेरून हाताला लागले  तेव्हा 
6)लॅपटॉप बाहेर काढून ठेवावा लागतो (आयपॅड सह)
एकदा माझे बॅग मध्ये बरेच चार्जर होते ,लॅपटॉप,मोबाईल वगैरे त्या बॅग ची सखोल तपासणी झाली ,फक्त मोबाइल चा चार्जर जवळ ठेवा बाकीचे सगळे चेक इन बॅग्स मध्ये टाका 
7)दारूची बाटली ड्युटी फ्री मध्ये घेतली तर ते बॅग देतात ती नीट सील करून देतात ते बघा नाही तर सिक्युरिटी वाले काढून टाकतील 
8) हल्ली मोबाइल ची पॉवर बँक केबिन बॅग्स मधेच नेऊ देतात ती चेक इन बॅग मध्ये ठेऊ नका
9) चेक इन बॅग ला कुलूप लावू नका ते तोडून टाकून तपासणी करतात 
मी माझ्या चेक इन बॅग्स ना कुलुपच्या जागी बारीक नट बोल्ट लावतो आणि बॅग ला घट्ट बांधायचा पट्टा 
त्या मुळे बॅग फक्त अधिकृत लोकांना उघडता येते पण पोर्टर/बॅग हँडल करणारे हात घालू शकत नाहीत 
10) चेक इन बॅग्स इतक्या सारख्या दिसायला लागतात बेल्ट वर मग हा पट्टा आणि बॅग ला चिकटवलेली masking टेप आणि त्या वरील तुमचे नाव या मुळे झटकन ओळख पटते 
एकदा मी बेल्ट कुठला हे कळायच्या आत माझी पट्टा वाली बॅग दिसली बेल्ट वर  फिरताना 
11) कधी कधी जास्त वेळ फिरलेली बॅग बेल्ट वरून काढून ठेवतात ,तुमची बॅग त्या लॉट मध्ये नाहीना हे पण चेक करा ,नाहीतर तुम्ही वाट पाहत  बसाल बेल्ट कडे बघत 
12)साधारण पणे लवकर (3 तास अगोदर), बॅग जमा केलीत तर ती सर्वात शेवटी मिळते असा माझा तरी अनुभव आहे 
13) अमेरिका सोडून बहुतेक ठिकाणी ट्रॉली फुकट मिळते 
अमेरिकेत 5 डॉलर भरावे लागतात कॅश मध्ये मग ट्रॉली ताब्यात मिळते 
जर दोघे असाल तर मोठी ट्रॉली चे 10 डॉलर आणि ती ढकलून पण बाहेर आणतात तेथील हमाल , ती परवडते  सगळे समान लोड करतात ,खाली करतात पूर्ण सर्व्हिस

14) वर एक महत्वाचा मुद्दा राहिला ,तुमच्या चेक इन बॅग चे मोबाईल वर फोटो काढून ठेवा 
माझ्या मित्राचे सामान फ्रँकफ्रुट ला पुढे चढवले गेले नाही लुफ्तान्स च्या गोंधळात ,त्याची सगळी ओषधे त्यात होती ,पण त्याने फोटो काढल्या मुळे त्याच्या बॅग्स लुफ्तान्स ला शोधून पाठवीत आल्या अमेरिकेत 
15) औषधे बाबतीत ही रिस्क घेऊ नका ती केबिन बॅग्स मध्येच न्या प्रिस्क्रिप्शन सह 

परदेश आणि देशातील तील प्रवासाचे धोके 
1) हल्ली विशेषतः युरोप मधील (खरे म्हणजे सगळी कडेच) भुरटे चोरटे खूप झाले आहेत 
निर्वासित स्वीकारल्या नंतर अगदी आपल्या देशी सुध्दा!
तुमचे  सामान कधी उचलतील हे सांगता येत नाही आणि तुम्ही विमानाने/कार ने/वरच्या वर्गातील रेल्वे प्रवास या मधून प्रवास करत असाल तर जास्तच 
अशा वेळी जवळचे सामान निरनिराळे ठेवा 
A फक्त पासपोर्ट एक अंगलागत राहणाऱ्या छोट्या पाउच किंवा बंडी मधेच ठेवा उगाच पासपोर्ट घेऊन जाऊ नका जर आणि जेथे जरुरी नसेल तर ,त्या ऐवजी मी मागे लिहिल्या प्रमाणे पासपोर्ट ची फोटो कॉपी आणि मागे सर्व माहिती असलेली घ्या 2,3 
B पैसे सगळ्यांनी वाटून घेऊन बाळगावे इंनर पॉकेट किंवा बंडी मध्ये थोडे पैसे वेगळे खुनी हल्ला होऊ नये पिस्तुल वापरून या साठी 
C घरची/कार ची चावी,कार्ड्स वेगळी पण जवळच 
D मेडिसीन्स 
E मंगळसूत्र,अंगठ्या ,चेन्स घरी ठेवा कुठला ही किंतु न बाळगता कारण चोरट्या ना भारतीय हे जवळ बाळगतातच हे माहिती झाले आहे 
आणि आपले पेहेराव,कुंकू,मेंदी या वरून भारतीय सगळ्या जगात ओळखला जातो 
2) कार बस रेल्वे ने प्रवास करत असाल तर पासपोर्ट ची वर उल्लेख केलेली पूर्ण माहिती पूर्ण कॉपी वेगळी कार मध्ये ठेवा इतर ठिकाणी वरच्या खिशात सहज उपलब्ध होईल पोलीस किंवा मदतकार्य करणाऱ्यांना म्हणजे  ते हॉस्पिटलमध्ये नेतील तेव्हा उपाय थांबणार नाहीतआणि  तुमच्या जवळच्या ना कळवायला उपयोगी पडेल हे 
3) तुमच्या ऍलर्जी ची आणि अर्जंट ओषधाची आणि एखादा लेटेस्ट ब्लड रिपोर्ट ,ब्लड गृप तरी जवळ बाळगा ,कधी ऑपरेशन झाले असेल त्या बद्दल पण लिहून ठेवा या लिस्ट मध्ये
4) फक्त आपल्या मोबाईल मध्ये ,गप्पा मध्ये गर्क राहू नका आपले समान,बरोबरच्या चे समान लहान मुले यांचे वर लक्ष ठेवा. 
मुले कधी नजर चुकवून पळतात ते कळत नाही तीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे
पत्नी ला तेथील भाषा अवगत नसेल किंवा इतर कोणाला ही अशा व्यक्ती वर विशेष लक्ष ठेवा ही मंडळी चुकली तर अनर्थ होतो आणि त्यांचे जवळ मोबाईल नसेल तर जास्तच. 


 

No comments:

Post a Comment